शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मोदींविरोधात सोशल मीडियावर लिहिणारा पोलीस निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 16:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिल्याने अहमदनगर जिल्ह्यात पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे.

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिल्याने अहमदनगर जिल्ह्यात पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. रमेश शिंदे असे या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून काल त्याला निलंबन करण्यात आल्याचं समजतय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून रमेश शिंदे हे कार्यरत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअॅपवरुन मोदींविरोधातील आक्षेपार्ह लिखाणाचा मजकूर इतर गृपवर पाठवला होता. हा मजकूर अनेक गृपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने चौकशी केली.त्यानंतर शिंदे यांच्या मोबाईलवरुन संबंधीत मेसेज व्हायरल झाल्याचं आढळल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र एका राजकीय नेत्याच्या अंगरक्षकाने पंतप्रधानांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण व्हायरल केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात आतापर्यंत सोशल मीडियावर लिखाण करणार्‍यांना नोटिसा आल्या आहेत. मात्र एखाद्या सरकारी व्यक्तीच्या निलंबनाची कदाचित ही पहिलीच घटना आहे.

'त्या' तरूणांना शरद पवारांची साथ, म्हणाले....मी तुमच्या पाठीशी आहे

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये सरकारच्या विरोधी लिहीलं म्हणून अनेक तरूणांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्या तरूणांनी काल मुंबईमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहू, असे आश्वासन शरद पवारांनी यावेळी तरूणांना दिले. एखाद्या विषयाबाबत, धोरणाबाबत आपलं मत मांडल्यास पोलीस नोटीस कशी काय पाठवू शकतात, असा सवालही त्यांनी फडणवीस सरकारला केला आहे. याबाबत शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस