पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:25 IST2021-09-12T04:25:56+5:302021-09-12T04:25:56+5:30

बेलापूर येथील शेतकरी श्याम पुजारी हे प्रशासकीय इमारत श्रीरामपूर येथे सरकारी कामासाठी आले होते. इमारतीच्या आवारामध्ये त्यांनी आपली दुचाकी ...

Police should start night patrols | पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी

पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी

बेलापूर येथील शेतकरी श्याम पुजारी हे प्रशासकीय इमारत श्रीरामपूर येथे सरकारी कामासाठी आले होते. इमारतीच्या आवारामध्ये त्यांनी आपली दुचाकी उभी केली. काम आटोपल्यानंतर दुचाकी घेण्यासाठी गेले असता दुचाकी नसल्याचे निदर्शनास आाले. दुचारी चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. प्रशासकीय इमारत आवारात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी त्वरित तपासून मोटारसायकल चोर जेरबंद करावा, अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील टाकळीभान येथे भोकर शिवारात चंद्रकांत लांडगे यांच्या फर्निश प्लाझा या फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी ४३ हजारांचा माल चोरून नेला. दोन महिन्यांपूर्वी गायकवाड वस्ती परिसरात, बोंबले वस्तीवर शिक्षक गृहनिर्माण संस्थेतील एका प्राध्यापकाच्या घरावर दरोडा पडला. अद्यापही पोलिसांना तपासात धागेदोरे मिळाले नाहीत. दरोडेखोर या परिसरात ७-८ दिवसांपासून येत आहेत. गॅस व वायर कटरचा वापर करून दार तोडून चोऱ्या होत आहेत. दहशतीमुळे परिसरातील नागरिक रात्रभर जागे असतात. पोलिसांची रात्रीची गस्त नाही. त्वरित गस्त सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Police should start night patrols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.