बोठेच्या अटकपूर्व जामिनासंदर्भात न्यायालयाने मागितले पोलिसांचे म्हणणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:14 IST2020-12-08T14:41:29+5:302020-12-08T15:14:09+5:30

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात शुक्रवारी (दि.११ डिसेंबर) जिल्हा न्यायालय सुनावणी होणार आहे.

Police say the court has asked for Bothe's pre-arrest bail | बोठेच्या अटकपूर्व जामिनासंदर्भात न्यायालयाने मागितले पोलिसांचे म्हणणे

बोठेच्या अटकपूर्व जामिनासंदर्भात न्यायालयाने मागितले पोलिसांचे म्हणणे

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात शुक्रवारी (दि. ११ डिसेंबर) जिल्हा न्यायालय सुनावणी होणार आहे.

बोठे याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी  न्यायालयात सोमवारी ॲड. महेश नवले यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी न्यायालयात या अर्जावर प्राथमिक सुनावणी होऊन न्यायालयाने सरकारी वकील व पोलिसांचे म्हणणे मागितले आहे. आता सरकारी पक्षाचे म्हणणे आल्यानंतर यावर पुढील सुनावणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे.

जरे यांचे हत्याकांड झाल्यानंतर मुख्य सूत्रधार म्हणून बाळ बोठे याचे नाव पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर बोठे  नगर शहरातून पसार झाला. पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत आहेत. तो मात्र अद्याप पर्यंत पोलिसांना सापडलेला नाही. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केलेले असून त्यातील दोघे न्यायालयीन कोठडी तर तिघे पोलीस कोठडीत आहेत.

Web Title: Police say the court has asked for Bothe's pre-arrest bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.