पोलीस भरतीची निवड यादी
By Admin | Updated: June 28, 2014 01:11 IST2014-06-27T23:06:55+5:302014-06-28T01:11:11+5:30
अहमदनगर: जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेली पोलीस शिपाई पदासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे़

पोलीस भरतीची निवड यादी
अहमदनगर: जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेली पोलीस शिपाई पदासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे़ प्रसिध्द करण्यात आलेल्या गुणांबाबत शंका असल्यास पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी केले आहे़
जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस शिपाई पदाच्या १८९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली़ भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात १०० गुणांची मैदानी चाचणी घेण्यात आली़ मैदानी चाचणीत २ हजार २५६ उमेदवार उत्तीर्ण झाले़ मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली़ परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी, निवड यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे़ आरक्षणनिहाय यादी जाहीर झाली असून, अंतिम यादी जाहीर झाली आहे़ निवड झालेल्या उमेदवाराचे नाव, मिळालेले गुण संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेख़ुल्या गटात अमोल नागले हा ९३ टक्के गुण मिळवून पहिला आहे़ आरक्षणनिहाय निवडीयादीबाबत उमेदवारांना हरकत असल्यास त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले़पोलीस भरती निवड समितीकडून हा निकाल संकेतस्थळावरच जाहीर केला आहे़ (प्रतिनिधी)