अफूच्या शेतात पोलिसांचा छापा; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 15:58 IST2021-02-26T15:57:30+5:302021-02-26T15:58:12+5:30

जातेगाव (ता.जामखेड) येथे एका शेतात छापा टाकून पोलीस पथकाने ५६ किलो वजनाची व १ लाख ७० हजार रूपये किंमतीची झाडे जप्त केली. पोलिसांनी गुरुवारी (दि.२५) रात्री आठ वाजता ही कारवाई केली.

Police raid on opium poppy fields; Two lakh worth of property confiscated | अफूच्या शेतात पोलिसांचा छापा; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

अफूच्या शेतात पोलिसांचा छापा; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

जामखेड : जातेगाव (ता.जामखेड) येथे एका शेतात छापा टाकून पोलीस पथकाने ५६ किलो वजनाची व १ लाख ७० हजार रूपये किंमतीची झाडे जप्त केली. पोलिसांनी गुरुवारी (दि.२५) रात्री आठ वाजता ही कारवाई केली.

या प्रकरणी शेतकरी वासुदेव महादेव काळे (वय ३९, रा. जातेगाव, ता. जामखेड) याच्या विरोधात अंमली औषधे द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम १५ क प्रमाणे जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 पोलिसांनी पंचनामा करून अफूच्या झाडांची लागवड करणाऱ्या वासुदेव काळे याला अटक केली.

 

Web Title: Police raid on opium poppy fields; Two lakh worth of property confiscated