पोलिस आणि जनतेचे नाते रक्ताचे- जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, लोकमतच्या रक्तदान अभियानाचे पोलीस मुख्यालयात उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 17:36 IST2021-07-10T12:54:54+5:302021-07-10T17:36:51+5:30
अहमदनगर : कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांचे जेवढे काम होते, तेवढेच काम पोलिसांनीही पार पाडले. जनतेला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसही रस्त्यावर उतरले होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून जनतेचे प्राण वाचविणयासाठी पोलिसांनीही काम केले. त्यामुळेच इतर देशांपेक्षा आपल्या देशात, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला. पोलिस आणि जनता यांचे नाते खऱ्या अर्थाने ‘रक्ताचं नातं’ आहे. त्यामुळेच ‘लोकमत’च्या अभियानात पोलिसांनाही रक्तदान करून आपली जनतेविषयची बांधिलकी अधिक दृढ केली, अशी भावना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केली.

पोलिस आणि जनतेचे नाते रक्ताचे- जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, लोकमतच्या रक्तदान अभियानाचे पोलीस मुख्यालयात उदघाटन
अहमदनगर : कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांचे जेवढे काम होते, तेवढेच काम पोलिसांनीही पार पाडले. जनतेला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसही रस्त्यावर उतरले होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून जनतेचे प्राण वाचविणयासाठी पोलिसांनीही काम केले. त्यामुळेच इतर देशांपेक्षा आपल्या देशात, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला. पोलिस आणि जनता यांचे नाते खऱ्या अर्थाने ‘रक्ताचं नातं’ आहे. त्यामुळेच ‘लोकमत’च्या अभियानात पोलिसांनाही रक्तदान करून आपली जनतेविषयची बांधिलकी अधिक दृढ केली, अशी भावना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केली.
‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत जवाहरलाल दर्डा उर्फ बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर रक्तदान महाअभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत लोकमत आणि जिल्हा पोलिस दल यांच्यावतीने आज पोलिस मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपाधिक्षक (गृह) बाजीराव पोवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले, रक्ताचं नातं हा शब्द समाजात नकारार्थी या अर्थाने घेतला जातो. मात्र ‘लोकमत’ने हा अर्थ व्यापक अर्थाने घेतला आहे. जात, धर्म या पलिकडे जावून रक्ताचं नातं जपता येते. रक्ताचं नातं खऱ्या अर्थाने मानवतेचे नाते आहे, असा व्यापक संदेश लोकमतने या अभियानातून दिला आहे. त्यामुळे या अभियानात पोलिसांनी सहभाग घेवून जनतेची असलेले रक्ताचं नातं अधिक घट्ट केले आहे.
सुरवातीला दिवंगत जवाहरलाल दर्डा यांना अभिवादन व दीपप्रज्वलन करून अभियानाचे उदघाटन झाले. लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके यांनी प्रास्ताविक केले. उपसंपादक अरुण वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. मुख्यालयात दिवसभर रक्तदान सुरू राहणार आहे.