पोलीस पुत्रांकडून मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: December 19, 2015 23:48 IST2015-12-19T23:41:44+5:302015-12-19T23:48:46+5:30
अहमदनगर : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शहराच्या मध्यवर्ती भागातील एका शाळेत घडली. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस पुत्रांकडून मुलीचा विनयभंग
अहमदनगर : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शहराच्या मध्यवर्ती भागातील एका शाळेत घडली. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिघांनाही अटक करण्यात आली असून दोघे तरुण पोलिसांचे पुत्र आहेत.
ग्रामीण भागातून आलेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणींसह वर्गात बसलेली होती. यावेळी अन्य मुलेही वर्गात होती. शुक्रवारी सकाळी तिघे तरुण वर्गात घुसले आणि वर्गातील मुलांना धमकावून मुलीला वर्गाबाहेर बोलावून घेतले. ‘तुझ्याशी बोलायचे आहे, तुझा मोबाईल नंबर दे’, असे म्हणत तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तिघाही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत. आरोपी असलेल्या किरण सुरेश शिंदे, आकाश राजेंद्र वांढेकर (रा. पोलीस मुख्यालय) आणि त्यांचा मित्र बाळासाहेब उर्फ विनोद कांबळे (रा. नालेगाव) अशा तिघांना अटक केल्याचे तोफखाना पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)