शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी अब्रू राखली

By admin | Updated: November 28, 2014 01:15 IST

श्रीरामपूर : न्यायालयाने शिक्षा सुनावताच तेथूनच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तीन आरोपी पसार झाल्याने श्रीरामपूर शहर पोलिसांची बुधवारी अब्रू गेली

श्रीरामपूर : न्यायालयाने शिक्षा सुनावताच तेथूनच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तीन आरोपी पसार झाल्याने श्रीरामपूर शहर पोलिसांची बुधवारी अब्रू गेली. पण प्रयत्नांची शिकस्त करून त्यांनी रात्रीतूनच या आरोपींच्या पुन्हा मुसक्या बांधल्याने गेलेली अब्रू वाचविण्यात यश आले.सचिन बबन भोसले (वय २४), नितीन बबन भोसले (वय २६), रेखा त्रिभुवन या तिघा आरोपींना बुधवारी श्रीरामपूर न्यायालयाने १० वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा ऐकताच या आरोपींनी न्यायालयातच पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळ काढला. न्यायालयाने शिक्षा सुनावलेले आरोपी न्यायालयातूनच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. आपली अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून पोलिसांनी बुधवारी पोलीस डायरीला याबाबत नोंद न करता हे प्रकरण दडपून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. न्यायालयाच्या आवारातील वकील, पक्षकार व इतर नागरिकांच्या गर्दीमुळे आरोपी न्यायालयाच्या आवारातून पसार होण्यात यशस्वी झाले. आरोपी पसार झाल्यामुळे हादरलेल्या पोलीस यंत्रणेने लगेचच आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक राकेश ओला, निरीक्षक सुरेश सपकाळे, सहायक निरीक्षक मनोजकुमार राठोड, पाळदे, फौजदार अनिल भिसे यांची ३ स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. त्यांनी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला. ओला व सपकाळे यांनी स्वत:कडे तपासाची सूत्रे घेत रात्रभर परिसर पिंजून काढला. लाल पल्सरवर हे आरोपी खंडाळा, रांजणखोलमार्गे पळाल्याची माहिती मिळाल्यावरुन त्यांच्या सर्व नातेवाईकांपर्यंत पोहचून पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा दवणगाव (ता. राहुरी) येथे आरोपी महिलेचे नातेवाईक असल्याची माहिती समजली. त्यानुसार सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिसे, हे.काँ. नाणेकर, कर्डिले, जाधव यांनी पहाटे ५ वाजेच्या सुमारास छापा टाकला. तेव्हा तेथे तिन्ही आरोपी झोपल्याचे दिसले अन् पोलिसांचा जीव भांड्यात पडला. या तिघांच्या मुसक्या बांधून त्यांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपींना पकडण्यासाठी सपकाळे यांनी मोबाईल लोकेशनची मिळविलेली माहिती सहाय्यभूत ठरली. या आरोपींविरूद्ध पोलीस हवालदार एकनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून भादंवि ३५३, २२४ नुसार नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)