घोडेगावमधील चोरीला गेलेली घंटा पोलिसांना सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 16:31 IST2018-05-19T16:30:08+5:302018-05-19T16:31:16+5:30

तालुक्यातील घोडेगाव येथील ख्रिस्त राजा चर्च मधून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेली घंटा नेवासा तालुक्यातील बेलपांढरी शिवारात शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना पोलिसांना आढळून आली.

Police have found the stolen bombs in Ghodegaon | घोडेगावमधील चोरीला गेलेली घंटा पोलिसांना सापडली

घोडेगावमधील चोरीला गेलेली घंटा पोलिसांना सापडली

नेवासा : तालुक्यातील घोडेगाव येथील ख्रिस्त राजा चर्च मधून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेली घंटा नेवासा तालुक्यातील बेलपांढरी शिवारात शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना पोलिसांना आढळून आली. तब्बल शंभर किलो वजन असलेली हि घंटा परिसरातील नागरिकांच्या मदतीने नेवासा पोलीस ठाण्यात आणण्यात आली .
       पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सदर घंटेचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून याविषयी माहिती घेतली. ही घंटा तालुक्यातील घोडेगाव येथील ख्रिस्त राजा चर्चची असल्याचे निष्पन्न झाले. ही घंटा दोन दिवसांपूर्वी ख्रिस्त राजा चर्च येथून चोरी गेली असून या बाबत पोलिसात तक्रार दिली नव्हती. शहानिशा करून या नेवासा पोलिसांनी फादर संजय पटारे व शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय सुखदान यांच्याकडे सदर घंटा सुपूर्द केली यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, तपास पथकाचे पोलीस हेडकोन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, बाबासाहेब लबडे, संदीप दरंदले उपस्थित होते.
 

Web Title: Police have found the stolen bombs in Ghodegaon