पोलीस असल्याचे सांगून लुटमार करणारा कुख्यात अबालू इराणी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:29 IST2021-06-16T04:29:04+5:302021-06-16T04:29:04+5:30

१६ फेब्रुवारी रोजी नगर-दौंड रस्त्यावरील काष्टी शिवारात शांताई लॉन्स समोर इराणी व त्याच्या दोन साथीदारांनी टेम्पोचालकाला अडवून आम्ही पोलीस ...

Police arrest notorious Abalu Irani for looting | पोलीस असल्याचे सांगून लुटमार करणारा कुख्यात अबालू इराणी जेरबंद

पोलीस असल्याचे सांगून लुटमार करणारा कुख्यात अबालू इराणी जेरबंद

१६ फेब्रुवारी रोजी नगर-दौंड रस्त्यावरील काष्टी शिवारात शांताई लॉन्स समोर इराणी व त्याच्या दोन साथीदारांनी टेम्पोचालकाला अडवून आम्ही पोलीस असल्याचे सांगत त्याच्याकडील २७ हजार रुपये हिसकावून नेले होते. याप्रकरणी चालक लखन दशरथ नायर (रा. बागवा, मध्यप्रदेश) याच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ११ जून रोजी इराणी हा काष्टी-मांडवगण फराटा शिवारात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाठलाग करून आरोपीस जेरबंद केले. अबालू इराणी याच्या विरोधात शिवाजीनगर, डेक्कन, विमाननगर, खडकी (पुणे), खंडाळा, श्रीगोंदा, आडगाव आदी पोलीस ठाण्यांत १७ गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस हवालदार अंकुश ढवळे, किरण बोराडे, दादा टाके, गोकूळ इंगवले, प्रताप देवकाते, प्रकाश मांडगे, अमोल कोतकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Police arrest notorious Abalu Irani for looting