विमानतळालगतच्या रस्त्यांच्या विकासासाठी नियोजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:42+5:302021-02-06T04:37:42+5:30
शिर्डी येथील विमानतळ आणि परिसर व्यवस्थापनासाठी परिसर व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ...

विमानतळालगतच्या रस्त्यांच्या विकासासाठी नियोजन करावे
शिर्डी येथील विमानतळ आणि परिसर व्यवस्थापनासाठी परिसर व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उपवनसंरक्षक एम. आदेश रेड्डी, शिर्डी विमानतळ संचालक दीपक शास्त्री, सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट दिनेश दहिवाडकर, सुरक्षा अधिकारी पंढरीनाथ शेळके उपस्थित होते.
विमानतळाचा मुख्य भाग व परिसरामध्ये विविध प्रकारची कार्ये निरंतर पार पाडण्यात येतात. ही सर्व कार्ये सुलभपणे पार पाडता यावी यासाठी सर्व संबंधित विभागांनी ताळमेळ ठेवावा. विमानतळ परिसरात बांधकाम नियंत्रणासाठी नगर विकास विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच विमान उड्डाण व उतरण्यासाठी बाधा पोहोचू नये यासाठी बॅनर्स उभारणी करण्यास मनाई करतानाच ग्रामपंचायतींनी दंडात्मक कारवाई करण्यासाठी ठराव करावा, असे सांगितले. कचरा संकलन व विल्हेवाट करणे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंची व जिल्ह्याची माहिती दर्शविणारे फलक विमानतळ परिसरात उभारणे, पोलीस चौकी स्थापन करण्याबाबत बैठकीत निश्चित करण्यात आले.
बैठकीला शिर्डीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, साई संस्थानचे मुख्य लेखाधिकारी बी.बी. घोरपडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बाळकृष्ण शेळके, राहाता गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, कोपरगाव गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, राहाता तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे उपस्थित होते.
------
फोटो - ०५शिर्डी बैठक
शिर्डी येथील विमानतळ परिसर व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला उपवनसंरक्षक एम. आदेश रेड्डी, शिर्डी विमानतळ संचालक दीपक शास्त्री, सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट दिनेश दहिवाडकर आदी उपस्थित होते.