देवस्थानच्या भूमिकेने कावडींनाही प्रवेश बंद

By Admin | Updated: April 7, 2016 00:04 IST2016-04-06T23:54:14+5:302016-04-07T00:04:31+5:30

बाळासाहेब शेटे, सोनई शिंगणापूर येथील शनिचौथऱ्यावरील प्रवेशाचा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे़

The place of place of worship is also closed to the cavalry | देवस्थानच्या भूमिकेने कावडींनाही प्रवेश बंद

देवस्थानच्या भूमिकेने कावडींनाही प्रवेश बंद

बाळासाहेब शेटे, सोनई
शिंगणापूर येथील शनिचौथऱ्यावरील प्रवेशाचा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कावडीधारक चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या स्वयंभू शिळेवर गंगाजल अर्पण करतील, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे तर दुसरीकडे कोणालाही चौथऱ्यावर जाऊ देणार नसल्याचा भूमिका देवस्थान ट्रस्टने घेतली आहे़ जर पुरुष चौथऱ्यावर जाणार असतील तर महिलाही चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतील असा पवित्रा भूमाता रणरागिणी महिला संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी घेतला आहे़
गुढीपाडव्याच्या दिवशी कुणालाही चौथऱ्यावर जाऊ देणार नसून एका स्टीलच्या टबमध्ये गंगाजल टाकून ते इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने चौथऱ्याखालूनच शनिदेवाच्या शिळेवर अर्पण केले जाईल, असे धोरण शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त आणि प्रशासनाने घेतले आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पोलीस प्रशासन मात्र पुरते गोंधळून गेल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी नेवासे तालुक्यातील प्रवरासंगम आणि श्रीक्षेत्र काशी येथून गंगाजल कावडीद्वारे आणून ते शनिदेवाच्या शिळेवर अर्पण केले जाते़ या सर्व कावडीधारकांना या दिवशी चौथऱ्यावर जाऊ देण्याची भूमिका शिंगणापूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी घेतली आहे. मात्र, यासंदर्भात देवस्थान विश्वस्त आणि प्रशासनाशी संपर्क साधला असता, दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीत कोणालाही चौथऱ्यावर जाऊ दिले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. ‘कावडीधारकांचा हिरमोड होऊ नये, यासाठी त्यांना चौथऱ्यावर जाऊ द्यावे. यामुळे होणाऱ्या परिणामांना सर्व ग्रामस्थ सामोरे जाण्यास तयार आहेत’, अशी भूमिका सरपंच बाळासाहेब बानकर, बाळासाहेब बोरुडे, सयाजी शेटे, गोरख शेटे, भाऊराव शेटे यांनी मांडली. एकूणच शनिशिंगणापूर चौथऱ्याचा वाद मिटण्याची चिन्हे दिसून न येता, हा वाद आणखी वाढत चालला आहे.
देवस्थान विश्वस्त आणि प्रशासनाची या संदर्भात बैठक बोलविण्यात आली, त्यावेळी एकाही ग्रामस्थाला विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप सरपंच बानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

Web Title: The place of place of worship is also closed to the cavalry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.