ढवळगाव-बेलवंडी फाटा मार्गावरील खड्डे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:54+5:302021-07-21T04:15:54+5:30

सुरेगाव येथील संजय रामफळे व त्यांची पत्नी आशा रामफळे, मुलगा वेदांत हे पुण्याला दुचाकीवर निघाले होते. कौठाळे मळ्याजवळ पडलेल्या ...

Pits on Dhawalgaon-Belwandi fork are dangerous | ढवळगाव-बेलवंडी फाटा मार्गावरील खड्डे धोकादायक

ढवळगाव-बेलवंडी फाटा मार्गावरील खड्डे धोकादायक

सुरेगाव येथील संजय रामफळे व त्यांची पत्नी आशा रामफळे, मुलगा वेदांत हे पुण्याला दुचाकीवर निघाले होते. कौठाळे मळ्याजवळ पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने त्यांचा अपघात झाला. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र कौठाळे, संतोष महाराज कौठाळे, विकास कौठाळे, श्रीकांत कौठाळे, सुरेश कौठाळे यांनी उपचारासाठी दवाखान्यात नेले. याअगोदर दुचाकीवरील तरुण खड्ड्यात गाडी आदळून जखमी झाले होते. सारंग दंडवते यांच्या गाडीचाही अपघात झाला होता.

शिरुर, पारनेर व श्रीगोंदा या तालुक्यांना जोडणाऱ्या वर्दळीच्या या रस्त्याची पावसामुळे मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहनांचे अपघात नित्याचेच झाले आहेत. ढवळगाव फाटा, देवदैठण येथील कौठाळे वस्ती, आंबराई, राजापूर फाटा, लांडग्याचा ओढा येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरील पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अन्यथा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे, सरपंच जयश्री गुंजाळ, उपसरपंच पूजा बनकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजेंद्र कौठाळे, कुकडीचे संचालक सुभाष वाघमारे, माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, उद्योजक अतुल लोखंडे, उद्योजक वसंत बनकर, हिंगणीचे माजी उपसरपंच संदीप तरटे, उद्योजक सर्जेराव कौठाळे यांनी दिला आहे.

200721\img-20210720-wa0028.jpg

photo

Web Title: Pits on Dhawalgaon-Belwandi fork are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.