बेलवंडी-शिरूर रस्त्यावर खड्डेच खड्डे
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:56+5:302020-12-05T04:37:56+5:30
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी-शिरूर रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात छोट्या-मोठ्या अपघाताच्या संख्याही वाढत आहेत. तालुक्यातील साखर ...

बेलवंडी-शिरूर रस्त्यावर खड्डेच खड्डे
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी-शिरूर रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात छोट्या-मोठ्या अपघाताच्या संख्याही वाढत आहेत. तालुक्यातील साखर कारखान्यांची ऊस वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. खड्ड्यांमुळे ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरचे अपघात होत आहेत. ट्रॅक्टरही उलटण्याच्या घटना घडल्या आहेत. ठेकेदाराने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली; परंतु ते निकृष्ट पद्धतीने बुजविण्यात आला, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पिंप्री चौफुला ते उक्कडगावपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी रस्ता उखडला आहे.