सारसनगर येथील पाईपच्या गोडावूनला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 20:45 IST2018-02-17T20:44:38+5:302018-02-17T20:45:05+5:30
शहरातील मार्केटयार्ड परिसरातील भवानीनगर येथील पाईप गोडावूनला आग लागून लाखो रूपयांचे नुकसा झाले. शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

सारसनगर येथील पाईपच्या गोडावूनला आग
अहमदनगर : शहरातील मार्केटयार्ड परिसरातील भवानीनगर येथील पाईप गोडावूनला आग लागून लाखो रूपयांचे नुकसा झाले. शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अग्नीशमन दलाच्या दोन ते अडिच तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
भवानीनगर येथे प्रविण कांजीभाई पटेल यांचे यांचे प्लास्टिक पाईचे गोडाऊन आहे. शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास या गोडावूनला आग लागली. परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने उग्र रूप धारण केल्याने अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. या आगीत इलेक्ट्रॉकि तारा जळून इतरत्र आग पसरू नये यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
आग विझविण्यासाठी महापालिकेचे दोन, एमआयडीसी येथील एक बंब घटनास्थळी दाखल झाले होते. सुमारे अर्धा तास ही आग धगधगत होती. त्यानंतर आग आटोक्यात आली.