नगरमध्ये उभारणार चित्रनगरी
By Admin | Updated: March 28, 2017 03:17 IST2017-03-28T03:17:50+5:302017-03-28T03:17:50+5:30
महापालिकेच्या मालकीच्या पिंपळगाव माळवी तलाव परिसरात चित्रपटनगरी उभारण्यात येणार आहे

नगरमध्ये उभारणार चित्रनगरी
अहमदनगर : महापालिकेच्या मालकीच्या पिंपळगाव माळवी तलाव परिसरात चित्रपटनगरी उभारण्यात येणार आहे. बीओटी तत्त्वावर ही चित्रपटनगरी विकसित करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती सचिन जाधव यांनी महासभेसमोर ठेवला. या प्रकल्पासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात १५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)