अकोल्यात पिकली पित्तनाशक ‘खोकली’ तूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:47+5:302020-12-13T04:34:47+5:30
कोतूळ : अकोले तालुक्यात आठ दहा गावांत पित्त न होणारी ‘खोकली’ तूर पिकली आहे. नवापूर नंदुरबार ते अकोले असा ...

अकोल्यात पिकली पित्तनाशक ‘खोकली’ तूर
कोतूळ : अकोले तालुक्यात आठ दहा गावांत पित्त न होणारी ‘खोकली’ तूर पिकली आहे. नवापूर नंदुरबार ते अकोले असा प्रावस कृषी विभागाने घडवून अकोल्यातील जैवविविधतेत नवा अध्याय जोडला आहे.
महाराष्ट्रात प्रादेशिक भिन्नतेने अनेक कृषी पिकांची स्थानिक खासियत असते. अशीच खासियत महाराष्ट्रात नवापूर (नंदुरबार) भागातील आदिवासी बांधवांनी हजारो वर्षांपासून जपले ते म्हणजे ''''खोकली'''' तूर हे स्थानिक नाव, तर काही ठिकाणी नवापुरी, देशी, तर महाराष्ट्रात ती दिवाळी तूर म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे शास्त्रीय नाव कॅजनस कॅजन आहे. सध्या अकोले तालुक्यातील केळी कोतूळ, केळी ओतूर, शिदवड, सोमलवाडी, धामणवन, माणिक ओझर, कोंभाळणे, शेणीत, शिरपुंजे या गावांत ती काढणीला आली आहे.
अकोलेचे प्रयोगशील कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी त्यांच्या मित्राकडून नवापूर (नंदुरबार) येथून दहा किलो खोकली तूर बियाणे मागविले. त्याचे समान १६० पाकिटे करून ते वरील दहा गावांत शेतकऱ्यांना जुलै महिन्यात दिले. सध्या या तुरीची काढणी पूर्ण होत आहे. अकोले तालुक्यातील पुढच्या हंगामात यातून किमान दीडशे किलो बियाणे निर्माण होणार आहे, तर पुढील तीन वर्षांनंतर ती घराघरात उपलब्ध होणार आहे.
....
तुरीचे वैशिष्ट्य
कुकरमधे एका शिटीत, तर पारंपरिक पद्धतीने पाच मिनिटांत शिजते. दाणे पांढरट पिवळे, तर डाळ सोनेरी पिवळी. शिजल्यावर दूरवर सुगंध पसरतो. कोवळ्या कोंबाची भाजी होते. इतर भागांचे हिरवळीचे खत होते. सध्या बाजारात या डाळीची किंमत १६० रुपये किलो आहे. ही तूर पावसावर माळरान, बांध, हलक्या कोरडवाहू जमिनीत पेरल्यास १२० दिवसांत कापणीला येते. आदिवासी, तसेच दुष्काळी भागात कोरडवाहूसाठी ही तूर वरदान ठरेल.
खोकली तुरीचे गुणधर्म
तुरीचे वरण म्हटले की अनेक जण पित्त होते म्हणून खाण्याचे टाळतात. मात्र, ‘खोकली’ तुरीमध्ये अँटिऑक्सिटंट, प्रोटीन भरभरून आहेत. मात्र, प्रोटीन आम्ल कमी असल्याने पित्त अजिबात होत नाही.
एरवी डाळी कच्च्या पद्धतीने डाळ गिरणीतून साली बाजूला करून काढतात किंवा पारंपरिक पद्धतीने भिजवून भरडतात. मात्र, खोकली तूर गरम राखेत हलकी भाजतात व थेट जात्यावर किंवा पाट्या वरवंट्याखाली भरडतात.
..
जोड