पिचकारी बहाद्दरांना ७१ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:26+5:302021-03-06T04:20:26+5:30

जिल्ह्यात १९ जानेवारी ते ४ मार्चपर्यंत मास्क न घालणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालने न करणे अशा एकूण ...

Pichkari Bahadur fined Rs 71,000 | पिचकारी बहाद्दरांना ७१ हजारांचा दंड

पिचकारी बहाद्दरांना ७१ हजारांचा दंड

जिल्ह्यात १९ जानेवारी ते ४ मार्चपर्यंत मास्क न घालणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालने न करणे अशा एकूण १५ हजार ३६५ जणांवर पोलिसांनी कारवाई करत २० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियम लागू करत त्यांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. नियमभंग करणाऱ्यांना सुरुवातील २०० रुपये दंड करण्यात येत होता. आता ५०० रुपये दंड आकारला जात आहे. त्यामुळे नागरिक आता घराबाहेर पडताच तोंडाल मास्क लावताना दिसत आहेत. नगर शहरात गुरुवारी चौकाचौकात पथकांची नेमणूक करून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. रात्री अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास बंदी आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविल्याने शहरात रात्री दहानंतर शांतता असते.

१४ दिवसांत अशी झाली कारवाई

विनामास्क-१४ हजार ५८० केस-१९ लाख ४२ हजार १०० रुपय दंड.

फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे- ३२५ केस- ४० हजार ५०० रुपयांचा दंड.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे- ४६० केस- ७१ हजार २०० रुपये दंड.

खासगी, शासकीय आस्थापनांसाठी ३०९ पथकांची नियुक्ती.

नियम पाळण्याबाबत ७४८ आस्थापनांना नोटीस जारी.

Web Title: Pichkari Bahadur fined Rs 71,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.