मिरवणुकीत झळकला औरंगजेबाचा फोटो, चौघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 10:06 IST2023-06-06T10:05:38+5:302023-06-06T10:06:32+5:30

मिरवणुकीत हातात औरंगजेबाचे फोटो घेऊन तरुणांनी घोषणाबाजी केली. 

photo of aurangzeb seen in the procession crime against four | मिरवणुकीत झळकला औरंगजेबाचा फोटो, चौघांवर गुन्हा

मिरवणुकीत झळकला औरंगजेबाचा फोटो, चौघांवर गुन्हा

लाेकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : मुकुंदनगर परिसरातील फकीरवाडा भागातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हातात औरंगजेबाचे फोटो घेऊन तरुणांनी घोषणाबाजी केली. 

याप्रकरणी चार जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद सफराज इब्राहिम सय्यद ऊर्फ सरफराज जहागीरदार, अफनान आदिल शेख ऊर्फ खडा, सरवर शेख, जावेद शेख ऊर्फ गब्बर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 
याबाबत पोलिस नाईक सचिन धोंडे यांनी दिलेल्या  फिर्यादीत आरोपी हे संगनमताने मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन सहभागी झाल्याचे म्हटले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


 

Web Title: photo of aurangzeb seen in the procession crime against four