जामखेड पंचायत समितीत फडकावली स्वराज्य गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:02+5:302021-06-09T04:26:02+5:30
जामखेड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४७ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त येथील पंचायत समिती कार्यालयात स्वराज्य गुढी उभारण्यात आली. तसेच ...

जामखेड पंचायत समितीत फडकावली स्वराज्य गुढी
जामखेड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४७ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त येथील पंचायत समिती कार्यालयात स्वराज्य गुढी उभारण्यात आली. तसेच खर्डा येथील भूईकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुढी उभारण्यात आली.
तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये भगवी पताका सरंपच यांच्या हस्ते उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पंचायत समिती सभापती राजश्री मोरे, उपसभापती मनीषा सुरवसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.
---
०७ जामखेड१
जामखेड पंचायत समिती आवारात शिवप्रतिमेचे पूजन सभापती राजश्री मोरे, उपसभापती मनिषा सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, सूर्यकांत मोरे, रवी सुरवसे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी व इतर.