पेट्रोल पंपाची तपासणी
By Admin | Updated: July 28, 2014 00:51 IST2014-07-27T23:18:45+5:302014-07-28T00:51:43+5:30
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील पेट्रोल पंपाची कर्जतच्या तहसीलदारांनी नुकतीच तपासणी केली. ‘लोकमत’ मधील वृत्ताची दखल घेत तपासणी केल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले.
पेट्रोल पंपाची तपासणी
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील पेट्रोल पंपाची कर्जतच्या तहसीलदारांनी नुकतीच तपासणी केली. ‘लोकमत’ मधील वृत्ताची दखल घेत तपासणी केल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले.
कर्जत तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपावरील सुविधांच्या बोजवाऱ्यावर ‘लोकमत’ ने प्रकाश टाकला होता. अनेक पेट्रोल पंपावरून हवा, पाणी, शौचालय, इंधनाचे दरपत्रक, शुद्धता आदी बाबी आढळून येत नसल्याने ग्राहक सुविधांपासून वंचित होते. ग्राहकांमधील जागृतीच्या अभावामुळे पेट्रोलपंप चालकांकडून नियमांची पायमल्ली होत होती.
तुटलेले पाण्याचे नळ, गळून पडलेले मशिनचे काटे, वापरण्यास अयोग्य हवेचे पाईप यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.
ग्राहकांच्या तक्रारी
तहसीलदार जयसिंग भैसडे यांच्याकडून तपासणी सुरू असताना बापूराव जाधव, आबासाहेब सुपेकर, प्रकाश सुपेकर या ग्राहकांनी पंपावर सलग आठ दिवसांपासून पेट्रोल, डिझेल उपलब्ध होत नसल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली.
(वार्ताहर)
पंप चालकाला सूचना
शुद्धता तपासणीत काही त्रूटी आढळल्या नाहीत. हवा, पाणी तसेच दर्शनी भागावर लावण्याचे फलक आढळून आले नाही. आढळलेल्या त्रूटी सुधारण्याविषयीच्या सूचना पंप चालकाला केल्या आहेत.
-जयसिंग भैसडे
तहसीलदार, कर्जत