विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST2021-08-01T04:20:23+5:302021-08-01T04:20:23+5:30
स्टार ९८४ श्रीरामपूर : वर्षभरात पेट्रोलच्या दरामध्ये तब्बल ३२ रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल ११० ...

विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग,
स्टार ९८४
श्रीरामपूर : वर्षभरात पेट्रोलच्या दरामध्ये तब्बल ३२ रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल ११० रुपयांपेक्षा अधिक तर डिझेल १०० रुपयांहून अधिक दराने विकले जात आहे. हे दर विमानामध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनापेक्षा दुपटीने अधिक आहेत. श्रीरामपूर शहरामध्ये पेट्रोलचा दर १०९ रुपयांपर्यंत तर डिझेलचा दर प्रति लीटर ९८ रुपयांच्या घरात पोहोचला आहे. तर दुसरीकडे विमानासाठी लागणाऱ्या इंधनाचा दर म्हणजे एव्हिएशन टर्बाईन फ्युअलचा भाव ५४ रुपये २४ पैसे इतका आहे. सर्वासामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरामुळे वाहन चालविणे कायमचे बंद करायचे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
विमानामध्ये प्रवास करणाऱ्या लोकांचे जीवनमान व आर्थिक स्तर कमालीचा उंचावलेला असतो. तुलनेत दुचाकी व चारचाकी वाहने ही गरजेतून वापरली जातात. ट्रान्सपोर्ट उद्योग तर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी चालतो. त्या उद्योगावरही इंधन दरवाढीमुळे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. हा संपूर्ण उद्योग कोलमडण्याच्या स्थितीत आला आहे.
-----------
चारचाकीमुळे आर्थिक झळ
कोरोनामुळे अनेकांनी स्वत:चे खासगी वाहन वापरण्याकडे कल वाढविला आहे. त्यामुळे वाहनविक्रीत वाढ झाली आहे. मात्र त्यानंतर झालेली इंधन दरवाढ आता डोकेदुखी ठरू लागली आहे. खिशाला कात्री बसल्याने कार खरेदीचा आनंद अल्पकाळ ठरला आहे.
---------
गेल्या काही महिन्यांपासून नवीन कार खरेदी करण्याचा माझा विचार होता. कुटुंबासाठी मोठी आसनक्षमतेची कार खरेदी करणार होतो. मात्र इंधन दरवाढीमुळे हा विचार पुढे ढकलला आहे.
- भरत बाठीया, व्यावसायिक, श्रीरामपूर
----------
पेट्रोल भरण्यापूर्वी सर्वसामान्यांना दहा वेळा विचार करावा लागतो. त्यामुळे सरकारने तातडीने दरवाढीतून दिलासा द्यायला हवा. सर्वच प्रकारच्या महागाईमुळे जीवनस्तर घसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
- दीपक महाले, व्यंगचित्रकार, शिरूर कासार
------------
स्टार ९८४स्टार ९८४