शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, भाजपमधील फरक जनतेला कामातून कळावा - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 05:22 IST

शिर्डीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात मंत्री गडकरी रविवारी बोलत होते.

शिर्डी : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत यशाचे सुवर्ण शिखर गाठले. मात्र, विजयाचे रूपांतर सुराज्यामध्ये करण्याची आता जबाबदारी आहे. काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपचे आले, यातील फरक जनतेला सांगता आला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. केवळ निवडणुकीतील यशाने मोठेपण येत नाही, अशीही सूचना त्यांनी केली.

शिर्डीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात मंत्री गडकरी रविवारी बोलत होते. गडकरी म्हणाले, निवडणुकांमध्ये नेते आमदार, खासदार होतात. मात्र, सर्वच आठवणीत राहत नाहीत. गुणांनी माणूस मोठा होतो. लोकांचे जीवन सुसह्य करणारे नेते हेच आठवणीत राहतात. भाजपच्या सत्तेत येण्याने काय झाले हे कामातून दाखवावे लागेल. जातीयता, सांप्रदायिकता नष्ट करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने शिवशाही स्थापन करण्यासाठी संधी दिली आहे. भविष्याचा महाराष्ट्र निर्माण करावयाचा आहे. ग्रामीण भागातून तरुणांचे मोठ्या प्रमाणावर शहरात विस्थापन होत आहे. 

ऑटोमोबाइलमध्ये महाराष्ट्राची भरारीऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने मोठी भरारी घेतली आहे. हे क्षेत्र देशाला सर्वाधिक कर मिळवून देते. ऑटोमोबाइलमध्ये राज्याला जगात प्रथम क्रमांकावर येण्याची क्षमता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये २२ हजार कोटी रुपयांची टोयोटा कंपनी गुंतवणूक करत आहे, अशी माहितीही मंत्री गडकरी यांनी दिली.

खेडी ओस पडू देऊ नका खेडी ओस पडत आहेत. ते थांबवावे लागेल. प्रत्येक तालुका, गाव हे स्मार्ट झाले तरच विस्थापन रोखता येऊ शकते. गडचिरोली जिल्ह्यात भाजपने विकासाचे मॉडेल राबविले आहे.तो जिल्हा येत्या पाच वर्षांत सर्वाधिक महसुली उत्पन्न मिळवून देणारा ठरेल, असेही गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाshirdiशिर्डी