शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:23+5:302021-05-18T04:21:23+5:30
अहमदनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिक्षक भारती संघटना जिल्हा कार्यकारिणीची ऑनलाइन मीटिंग ...

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार
अहमदनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिक्षक भारती संघटना जिल्हा कार्यकारिणीची ऑनलाइन मीटिंग शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सहविचार सभेत अहमदनगर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यासाठी शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत, असे संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर यांनी सांगितले.
वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भातील समस्या डी.सी.पी.एस. पावत्या न मिळणे, १ तारखेला पगार न होणे, सातवा वेतन आयोग पहिला हप्ता अद्याप काही शिक्षकांना न मिळणे, शालार्थ आय.डी. त्वरित देणे, विनाअनुदानित अपात्र शाळांना त्वरित अनुदान देणे, सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती करणे, सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे, शासनाने कोरोनासारख्या महामारीत शिक्षकांना कॅशलेस मेडिकल योजना आणणे, शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊनही अद्याप काही शिक्षकांना पूर्ण वेळ वेतनश्रेणी मान्यता न मिळणे, कनिष्ठ महाविद्यालयाची संचमान्य ता २०१८-१९ प्रमाणे ठेवणे, डी.सी.पी.एस. खात्याचा हिशोब देऊन ती रक्कम एन.पी.एस. मध्ये त्वरित वर्ग करणे, तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना मानधन वाढवणे व नवीन शिक्षक भरतीत प्राधान्य द्यावे, अर्धवेळ शिक्षकांना महागाई भत्ता, घरभाडे, सेवा शाश्वती देणे, नवीन शैक्षणिक धोरणातील संभ्रम दूर करणे यांसारख्या अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा सहविचार सभेत झाली.
सभेसाठी राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप उच्च माध्यमिक विभागाचे सरचिटणीस महेश पाडेकर, जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, डॉ.किशोर डोंगरे, मनोहर राठोड, तालुकाध्यक्ष संभाजी पवार, जिल्हा हिशोब तपासणीस सोमनाथ बोंतले, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष सचिन जासूद, महिला अध्यक्ष आशा मगर, रूपाली कुरुमकर, माध्यमिक विभागाचे सचिव विजय कराळे, कैलास राहणे, श्याम जगताप, दिनेश शेळके, प्रवीण मते, संजय तमनर, रोहिदास चव्हाण, बाबासाहेब लोंढे, सुदाम दिघे, हनुमंत रायकर, कैलास जाधव, नवनाथ घोरपडे, किसन सोनवणे, सिकंदर शेख, हर्षल खंडिझोड, अशोक अन्हाट, संभाजी चौधरी, मोहंमद समी शेख, श्रीकांत गाडगे, सूर्यकांत बांदल, जॉन सोनवणे, बाळासाहेब शिंदे, रेवन घंगाळे, प्रशांत कुलकर्णी, एम.पी. शिर्के, हनुमंत बोरुडे, प्रकाश मिंड, मधुकर नागवडे, महादेव कोठारे, संतोष देशमुख, योगेश हराळे, काशीनाथ मते, रामराव काळे आदी उपस्थित होते.