नियम न पाळणाऱ्यांना पावणेदाेन लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:18 IST2021-04-03T04:18:21+5:302021-04-03T04:18:21+5:30
अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली असून, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांकडून १ लाख ७७ ...

नियम न पाळणाऱ्यांना पावणेदाेन लाखांचा दंड
अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली असून, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांकडून १ लाख ७७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नगर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नगरकरांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांकडून मास्क न वापरणे, दुकानांमध्ये, भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. मास्क न वापरणे व नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने प्रभागनिहाय भरारी पथके स्थापन केली आहेत. या पथकांनी दिनांक १७ मार्च ते ४ एप्रिल या काळात ३०६ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, गाडगीळ पटांगण, यशोदा नगर, चितळे रोड, भुतकरवाडी चाैक आदी भागात भाजी विक्रेते पथारी टाकून बसतात. सामाजिक अंतर ठेवून बसण्याबाबत महापालिकेकडून वेळोवेळी सूचना केल्या गेल्या. परंतु, भाजी विक्रेते गर्दी करत असल्याने भरारी पथकाने विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा धडाकाच सुरू केला असून, यशोदा नगर येथील भाजी विक्रेत्यांना शुक्रवारी उठविण्यात आले.
...
असा केला दंड
- २७३ जणांना २०० रुपये दंड
- १३ जणांना ५०० रुपये दंड
- १९ जणांना ५,००० रुपये दंड
- २ जणांना १०,००० रुपये दंड
- एकाला १,००० रुपये दंड
....
कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असून, नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे.
- शशिकांत नजान, भरारी पथक प्रमुख