ग्रामीण रुग्णालयांमधील कंत्राटी वाहनचालकांचे थकीत वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:28+5:302021-07-20T04:16:28+5:30

अहमदनगर : ग्रामीण रुग्णालयामधील सर्व कंत्राटी वाहन चालकांचे थकित वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ...

Pay the overdue salaries of contract drivers in rural hospitals | ग्रामीण रुग्णालयांमधील कंत्राटी वाहनचालकांचे थकीत वेतन द्या

ग्रामीण रुग्णालयांमधील कंत्राटी वाहनचालकांचे थकीत वेतन द्या

अहमदनगर : ग्रामीण रुग्णालयामधील सर्व कंत्राटी वाहन चालकांचे थकित वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अमित गांधी, वाहन चालक दीपक कांबळे, रोहित होडशीळ, कडूबाळ खरात, दत्तात्रय ठुबे, बाबासाहेब गोफणे, विलास शिंदे, गुलाब शिवरकर, रुपेश घंगाळे, किशोर बनसोडे, दिगंबर मुखेकर, सचिन साळुंखे आदी उपस्थित होते.

कंत्राटी वाहन चालक १ एप्रिल २०२१ पासून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे तोंडी आदेश, सेवा अभियंता, अहमदनगर व वैद्यकीय अधीक्षक यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कंत्राटी वाहन चालक म्हणून आजपर्यंत २४ तास सेवा देण्याचे काम करीत आहेत. या कंत्राटी वाहनचालकांना विमा संरक्षण नसताना देखील ते कोविड रुग्णांची सेवा करीत आहेत. आजपर्यंत त्यांना कामाचे वेतन मिळालेले नाही तसेच कोविड भत्ता सुद्धा मिळालेला नाही. त्यामुळे सर्व १०२ कंत्राटी वाहनचालकांना समान काम समान वेतन नुसार थकित वेतन मिळावे, सर्व कंत्राटी वाहन चालक १० ते १५ वर्षापासून कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा करण्याचे काम करीत आहेत. त्यांना १ एप्रिल २०२१ पासून थकलेले वेतन लवकरात लवकर मिळावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. -----------

फोटो - १९ जन आधार निवेदन

ग्रामीण रुग्णालयामधील सर्व कंत्राटी वाहन चालकांचे थकित वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

Web Title: Pay the overdue salaries of contract drivers in rural hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.