अंनिसच्या जिल्हाध्यक्षपदी पाटील

By | Updated: December 5, 2020 04:40 IST2020-12-05T04:40:44+5:302020-12-05T04:40:44+5:30

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहमदनगर जिल्ह्याची बैठक पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख मिलिंद बागवे यांच्या अध्यक्षतेखाली नगर शहरात झाली. ...

Patil as the district president of Annis | अंनिसच्या जिल्हाध्यक्षपदी पाटील

अंनिसच्या जिल्हाध्यक्षपदी पाटील

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहमदनगर जिल्ह्याची बैठक पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख मिलिंद बागवे यांच्या अध्यक्षतेखाली नगर शहरात झाली. त्यात अध्यक्ष म्हणून यशवंत पाटील, तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून रघुनाथ गायकवाड यांची निवड करण्यात आली. याशिवाय भगवान जगताप (जिल्हा संघटक), गणेश सांगळे (सचिव), गोरख आळेकर (कार्याध्यक्ष), बाबासाहेब शेलार (उपाध्यक्ष), सुदेश गायकवाड (खजिनदार), संगीता मालकर (महिला अध्यक्ष), विशाल आठवले (युवा संघटक), तर सदस्य म्हणून सुनील जगधने, सतीश मंतोडे, अविनाश कुटे, नागेश शिंदे, गणेश केंदळे, प्रवीण बळीद, राजू काळे, नारायण डुकरे, दीपक पारखे, जगदीश राठोड, संजय वारभोर आदींची निवड करण्यात आली. यावेळी मराठवाडा संपर्कप्रमुख किशोर वाघ, राज्य कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे यांची उपस्थिती होती.

Web Title: Patil as the district president of Annis