म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला आर्थिक मदतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:20 IST2021-05-17T04:20:07+5:302021-05-17T04:20:07+5:30

जामखेड : पिंपरखेड येथील रामभाऊ महादेव ढवळे (वय ४८) यांना म्युकरमोयकोसिस आजाराचे निदान झाले आहे. त्यांना उपचारांसाठी दहा ते ...

Patients with mucomycosis need financial help | म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला आर्थिक मदतीची गरज

म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला आर्थिक मदतीची गरज

जामखेड : पिंपरखेड येथील रामभाऊ महादेव ढवळे (वय ४८) यांना म्युकरमोयकोसिस आजाराचे निदान झाले आहे. त्यांना उपचारांसाठी दहा ते अकरा लाख रुपयांची गरज असून, तीन लाख रुपयांची मदत जमा झाली आहे. आणखी किमान सात ते आठ लाख रुपयांची उपचारांसाठी गरज असून, त्यासाठी दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.

पिंपरखेड येथील रामभाऊ ढवळे यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. त्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिसने गाठले. त्यांच्यावर नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आजाराने त्यांचे दोन्ही डोळे सुजले आहेत. एका डोळ्याची नजर कमी झाली आहे. त्यांच्या उपचारार्थ पत्नी औषधाची शोधाशोध करते आहे. तिचा एकाच वेळी आजाराबरोबरच परिस्थितीशीही संघर्ष सुरू आहे.

रामभाऊ हे एकुलते असून, आई-वडील वयोवृद्ध आहेत. पत्नी आणि एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रामभाऊ एका खासगी कारखान्यात काम करायचे. मात्र, तो कारखाना काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरूच होता. त्यात कोरोना महामारीत कोरोनाच्या संसर्गाने रामभाऊ यांना गाठले आणि कुटुंबासमोर नवीन आव्हान उभे राहिले. त्यांना कोरोनाच्या उपचारांसाठी जामखेड, श्रीगोंदा येथे उपचारार्थ फिरावे लागले. रेमडेसिविरची गरज पडली असता खासदार डॉ. सुजय विखे, आमदार रोहित पवार व माजी मंत्री प्रा. राम शिंदे या तिघांकडूनही प्रत्येकी दोन इंजेक्शन मिळाले. यातून ढवळे कुटुंब सावरेल असे वाटत असतानाच त्यांना म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव झाला. उपचारासाठी पत्नीने नगर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. यासंदर्भात त्यांच्या नववी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना भेटून हकिगत सांगितली. त्यानंतर तहसीलदारांनीही त्यांच्या मदतीसाठी मोहीम सुरू केली.

---

मदतीसाठी अकाउंट क्रमांक...

मदतीसाठीच्या अकाउंटची माहिती अशी : रामभाऊ महादेव ढवळे, युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा : राशीन, ता. कर्जत, अकाउंट क्रमांक : ३६४२०२०१०११५२४७, आयएफएससी कोड : यूबीआयएन०५३६४२३ दानशूरांनी या क्रमांकावर मदत करण्याचे आवाहन तहसीलदार नाईकवाडे यांनी केले आहे.

Web Title: Patients with mucomycosis need financial help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.