पथदिवे घोटाळ्यात अटकेत असलेल्या उपायुक्तांची महापालिकेत आणून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 13:46 IST2018-03-10T13:44:59+5:302018-03-10T13:46:25+5:30
अहमदनगर महापानगरपालिकेतील गाजलेल्या पथदिवे घोटाळ्यातील आरोपी उपायुक्त विक्रम दराडे, कॅफो दिलीप झिरपे यांना शनिवारी सकाळी महापालिकेत आणून चौकशी करण्यात आली.

पथदिवे घोटाळ्यात अटकेत असलेल्या उपायुक्तांची महापालिकेत आणून चौकशी
अहमदनगर : अहमदनगर महापानगरपालिकेतील गाजलेल्या पथदिवे घोटाळ्यातील आरोपी उपायुक्त विक्रम दराडे, कॅफो दिलीप झिरपे यांना शनिवारी सकाळी महापालिकेत आणून चौकशी करण्यात आली.
महापालिकेतील ३८ लाख रुपयांच्या पथदिवे घोटाळ्यात आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. महापालिकेचे उपायुक्त विक्रम दराडे, कॅफो दिलीप झिरपे यांच्या कोठडीची मुदत आज, शनिवारी संपत आहे. तत्पूर्वी पोलिसांनी दोघांनाही महापालिकेत आणून चौकशी करण्यात आली. यावेळी एका बड्या ठेकेदारालाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. तेथे त्यांची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान शुक्रवारीही दराडे व झिरपे यांना महापालिकेत आणून विविध विभागात बसवून त्यांची चौकशी करण्यात आली होती.
या घोटाळ्यातील आरोपी विद्युत विभागाचा प्रमुख रोहिदास सातपुते व सुपरवायझर बाळासाहेब सावळे हे दोघे फरार आहेत.