पाथर्डी पालिकेचा अभियंता २० हजाराची लाच घेताना पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 15:41 IST2019-03-13T15:41:28+5:302019-03-13T15:41:51+5:30
पालिकेचे पाणीपुरवठा तसेच स्वच्छता विभागाचे अभियंता कुणाल पाटील यांना अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

पाथर्डी पालिकेचा अभियंता २० हजाराची लाच घेताना पकडला
पाथर्डी : पालिकेचे पाणीपुरवठा तसेच स्वच्छता विभागाचे अभियंता कुणाल पाटील यांना अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांचा सध्या पाथर्डी शहरांमध्ये स्वच्छतेचा ठेका असून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पाथर्डी पालिकेमध्ये येत्या काही दिवसात शहरातील स्वछतेची पाहणी करण्यात येणार होती. पथकाला चांगला अभिप्राय देण्यासाठी २० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून कुणाल पाटील याने वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्याच अनुषंगाने काल आरोपीने तक्रारदार आणि पंचासमक्ष वीस हजार रुपयांची लाच मागितली. आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष आरोपीला वीस हजार रुपयांची लाच घेताना पालिका कार्यालयात रंगेहाथ पकडले.