रेल्वेस्थानकावर अपघात, प्रवाशाचा चिरडून मृत्यू
By शिवाजी पवार | Updated: March 29, 2024 17:10 IST2024-03-29T17:09:16+5:302024-03-29T17:10:07+5:30
अहमदनगर येथील रेल्वेस्थानकावर गाडी आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला.

रेल्वेस्थानकावर अपघात, प्रवाशाचा चिरडून मृत्यू
शिवाजी पवार, अहमदनगर : येथील रेल्वेस्थानकावर गाडी आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
गुरुवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. साईनगर एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी येथील रेल्वेस्थानकावर आली होती. त्यावेळी चालत्या गाडीतून उतरताना हा प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनमध्ये अडकला गेला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात तत्काळ हलविले.
मात्र डॉक्टरांनी त्याला तेथे मृत घोषित केले. हवालदार किरण शिंदे यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात खबर नोंदविली. पोलिसांनी मयताचे वर्णन जारी केले असून माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.