‘संजीवनी’च्या विद्यार्थ्यांचा ग्रामीण विकासात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:59+5:302021-03-06T04:19:59+5:30
राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संजीवनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि संजीवनी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय ...

‘संजीवनी’च्या विद्यार्थ्यांचा ग्रामीण विकासात सहभाग
राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संजीवनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि संजीवनी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ भारत अभियान, सक्षम युवा समर्थ भारत अभियान आणि एक भारत श्रेष्ठ भारत या तिन्ही उपक्रमांतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे आयोजित करण्यात आले. त्याचे उद्घाटन सुमित कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराप्रसंगी कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कैलास माळी, धामोरी गावचे सामाजिक कार्यकर्ते नारायण भाकरे, ग्रामसेवक फुलसिंग तडवी, संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. ए. जी. ठाकूर, संजीवनी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. के. एस. साळुंखे, संजीवनी सीनिअर काॅलेजचे प्राचार्य डाॅ. एस. बी. दहिकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. नागोराव सुरनर, प्रा. शशिकांत होन व प्रा. अजिंक्य कुऱ्हे, ऋषिकेश भांड, ऋषिकेश आघाव, यश रसाळ उपस्थित होते. या श्रमसंस्कार शिबिरात २०० महाविद्यालयीन मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी समाधान ढगे व हुमेरा शेख यांनी केले, तर संकेत बावके याने आभार मानले.