पारनेरच्या तृप्ती तुपेचा मारेकरी अटकेत

By Admin | Updated: August 24, 2014 02:06 IST2014-08-24T01:57:17+5:302014-08-24T02:06:31+5:30

तृप्ती तुपे हिच्या खुनप्रकरणी पोलिसांनी संतोष विष्णु लोणकर यास अटक केली असल्यचाी माहिती पोलिस निरीक्षक जांभळे यांनी दिली.

Parner's torture detainees detained | पारनेरच्या तृप्ती तुपेचा मारेकरी अटकेत

पारनेरच्या तृप्ती तुपेचा मारेकरी अटकेत

पारनेर : अळकुटी येथील साईनाथ विद्यालयातील दहावीतील विद्यार्थिनी व लोणी मावळा येथील रहिवाशी तृप्ती तुपे हिच्या खुनप्रकरणी पोलिसांनी संतोष विष्णु लोणकर यास अटक केली असल्यचाी माहिती पोलिस निरीक्षक जांभळे यांनी दिली. खून का केला? या कारणाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी लोणी मावळा येथे शनिवारी (दि़२३) कोंम्बिंग आॅपरेशन राबवून काही संशयितांना ताब्यात घेतले़, त्यातीलच एक मारेकरी निघाला. दरम्यान लोणी मावळा ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी केली़
तृप्ती पोपट तुपे या विद्यार्थिनीचा शुक्रवारी दुपारी चार वाजता घरी जाताना खून करण्यात आला होता़ शाळेतील चाचणी परीक्षा संपल्यानंतर तृप्ती घराकडे जाताना पाऊस आल्यामुळे कुकडी कॅनॉलच्या पोटचारी जवळ झाडाखाली थांबली होती़ त्यावेळी पोटचारीखाली खेचून तिचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला़ या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक लखमी गौतम, उपअधिक्षक वाय. डी. पाटील यांनी लोणीमावळा येथे जाऊन तपासाची सूत्रे फिरवली़ त्यानंतर काही तासांतच तिच्या मारेकऱ्यास अटक करण्यात यश मिळाले. (प्रतिनिधी)

Web Title: Parner's torture detainees detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.