पारनेर तालुक्यात बिबट्याला कोंडले घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 11:53 IST2019-04-26T11:53:40+5:302019-04-26T11:53:59+5:30

पारनेर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर काळेवाडी येथील चैनू कोंडीबा शिंदे यांच्या वर आज सकाळी बिबट्याने हल्ला केला.

In Parner taluka, the leopard is in Kondale house | पारनेर तालुक्यात बिबट्याला कोंडले घरात

पारनेर तालुक्यात बिबट्याला कोंडले घरात

पारनेर : पारनेर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर काळेवाडी येथील चैनू कोंडीबा शिंदे यांच्या वर आज सकाळी बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर ग्रामस्थांनी बिबट्याला घरात कोंडले.
सकाळपासूनच बिबट्याने धुमाकुळ घातला होता. त्यातच शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये शिंदे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागाशी संपर्क साधण्यात आला आहे.

Web Title: In Parner taluka, the leopard is in Kondale house