पारनेर तालुक्यात महिनाभरात ५४६ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:17 IST2021-04-03T04:17:10+5:302021-04-03T04:17:10+5:30
पारनेर : तालुक्यात मार्चमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळले. केवळ मार्च महिन्यात ५४५ जण बाधित झाले आहेत. टाकळी ढोकेश्वर, ...

पारनेर तालुक्यात महिनाभरात ५४६ कोरोनाबाधित
पारनेर : तालुक्यात मार्चमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळले. केवळ मार्च महिन्यात ५४५ जण बाधित झाले आहेत. टाकळी ढोकेश्वर, पारनेर, कान्हूर पठार, वासुंदे, कळस ही गावे हॉटस्पॉट बनली आहेत, तसेच ८ हजार ८९६ जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.
पारनेर तालुक्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पहिल्या टप्प्यात दुर्गम अशा वनकुटे, पळसपूर, पोखरी, काटाळवेढा, ढवळपुरी, वडगाव सावताळ, खडकवाडी, मांडवे खुर्द, म्हसोबा झाप येथे रुग्ण वाढत गेले. तेथील तीन ते चार जणांचा कोरोनाने मृत्यूही झाला.
--
टाकळी ढोकेश्वरला सर्वाधिक रुग्ण..
टाकळी ढोकेश्वर येथे सर्वाधिक रुग्ण आहेत. येथे ७१ जण काेरोनाबाधित आहेत. येथे ग्रामपंचायतीने लॉकडाऊन केले आहे, तसेच पारनेर शहरातील संभाजीनगर, सुतारगल्ली, नवी पेठ, शिवाजी पेठ, नागेश्वर वसाहत येथे बाधित संख्या अधिक आहे. कान्हूर पठार, वासुंदे, भाळवणी, येथेही मोठ्या प्रमाणावर कोरोना फैलावत आहे. सुपा एमआयडीसीच्या दोन कंपन्या, पारनेरमधील महाराष्ट्र बँक शाखेत रुग्ण आढळले आहेत.
--
पिंपळगाव रोठा येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे विलगीकरण कक्षात कोरोनाबाधितांना ठेवण्यात येत आहे, तसेच तालुक्यातील खासगी डॉक्टरही सेवा देत आहेत.
-ज्योती देवरे,
तहसीलदार, पारनेर
--
पारनेर तालुक्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारीही केली आहे. नागरिकांनीही कोरोनाबाबतचे नियम पाळायला हवेत. आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
-प्रकाश लाळगे,
तालुका आरोग्य अधिकारी, पारनेर