संचारबंदीत पारनेर तहसीलदारांचा नाशिक दौरा, मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार: चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:32 IST2020-04-13T10:32:21+5:302020-04-13T10:32:42+5:30

अहमदनगर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी राज्यात लागू झालेल्या संचारबंदीनंतर पारनेरच्या तहसीलदार ज्योती कावरे यांनी नाशिक दौरा करून जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार तिखोल (ता़ पारनेर) येथील धोंडीबा जबाजी शेटे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे़

Parner tahsildar visits Nashik in communication block, complains to CM's office: demand for inquiry | संचारबंदीत पारनेर तहसीलदारांचा नाशिक दौरा, मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार: चौकशीची मागणी

संचारबंदीत पारनेर तहसीलदारांचा नाशिक दौरा, मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार: चौकशीची मागणी

अहमदनगर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी राज्यात लागू
झालेल्या संचारबंदीनंतर पारनेरच्या तहसीलदार ज्योती कावरे यांनी नाशिक
दौरा करून जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार तिखोल (ता़
पारनेर) येथील धोंडीबा जबाजी शेटे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली
आहे़
    याबाबत केलेल्या तक्रारीत शेटे यांनी म्हटले आहे की, शासनाने
जिल्हाबंदीचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या
होत्या़ याचवेळी बाहेरून येणाºया प्रवाशांना रोखण्याचे मोठे आव्हान
प्रशासनासमोर होते. दि़२८ मार्च रोजी  पारनेर तालुक्याच्या हद्दीतील
रस्त्यांवरून नगर जिल्ह्यात अनेक वाहने येत होते़ या नागरिकांना
रोखण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले होते़ नगर-पुणे महामार्ग,
नगर-कल्याण महामार्ग येथील तपासणी नाक्यांवर पोलीस २४ तास पहारा देत
होते़ अशावेळी परिस्थितीवर लक्ष्य ठेवण्याची जबाबदारी तहसीलदार देवरे
यांची होती़ २८ मार्च रोजी मात्र देवरे या शासकीय वाहनातून नाशिकला
गेल्या त्यानंतर दुसºया दिवशी त्या तालुक्यात आल्या़ असा आरोप  शेटे
यांनी केला आहे़ तसेच तहसीलदार उपस्थित नसताना दरम्यानच्या काळात बाहेरील
जिल्ह्यातून अनेक वाहने पारनेर तालुक्यात व नगर जिल्ह्यात आली़ याप्रकरणी
योग्य ती चौकशी करावी,अशी मागणी  तक्रारीत शेटे यांनी केली आहे़

टोलनाक्याच्या सीसीटीव्हीत दिसले वाहन
पारनेरच्या तहसीलदार ज्योती कावरे वापरत असलेले सरकारी वाहन हे २८ मार्च
रोजी संगमनेर व सिन्नर येथील टोलनाक्यांच्या सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये
दिसत असल्याचे शेटे यांनी तक्रारीत म्हटले असून या वाहनाचे फोटोही
मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविले आहेत़ या वाहनात तहसीलदार होत्या का?
असतील तर त्यांना संचारबंदीच्या काळात कामाचे ठिकाण सोडून नाशिकला
जाण्याची कुणी परवानगी दिली तसेच जिल्ह्याच्या बाहेर जाताना शासकीय वाहने
घेऊन जाता येते का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत़

कोरोना या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यात चमकोगिरी
करणाºयांना मी चाप लावला आहे़ त्याचाच बदला म्हणून काही लोक
माझ्याविरोधात षड्यंत्र रचून खोटी माहिती प्रसारित करत आहेत़ पारनेर
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मी माझे काम योग्य आणि
प्रमाणिकपणे करत आहे़ २८ मार्च रोजी मी कामाच्या ठिकाणीच हजर होते़ त्या
दिवशी केलेल्या कामाचा तपशील माझ्याकडे आहे़ मी कुठेही बाहेर गेलेले
नव्हते़ तक्रार करणारांना कुणीतरी खोटी माहिती पुरविली आहे़
^-ज्योती देवरे, तहसीलदार पारनेर

Web Title: Parner tahsildar visits Nashik in communication block, complains to CM's office: demand for inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.