पारनेरसह आता नगर तालुक्यात रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:19+5:302021-07-27T04:22:19+5:30

अहमदनगर : पारनेर, श्रीगोंदा, जामखेडपाठोपाठ आता नगर शहर आणि नगर तालुक्यात रुग्ण वाढले आहेत. सोमवारी जिल्ह्यात ६२८ कोरोनाचे रुग्ण ...

With Parner, the number of patients has now increased in Nagar taluka | पारनेरसह आता नगर तालुक्यात रुग्ण वाढले

पारनेरसह आता नगर तालुक्यात रुग्ण वाढले

अहमदनगर : पारनेर, श्रीगोंदा, जामखेडपाठोपाठ आता नगर शहर आणि नगर तालुक्यात रुग्ण वाढले आहेत. सोमवारी जिल्ह्यात ६२८ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ६६४ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी ४४४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८३ हजार ५९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९६.३३ टक्के कायम आहे. रविवारी दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा एक हजारांच्यावर गेला होता. त्यामुळे जिल्ह्यात नियमांचे काटेकोरपणे पालन होते की नाही, याबाबत प्रशासनही सतर्क झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १८४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १८२ आणि अँटिजेन चाचणीत २६२ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये पारनेरमध्ये सर्वाधिक ९३ रुग्ण आढळले. त्या खालोखाल नगर तालुक्यात ८१ रुग्ण, तर नगर शहरात ४९ रुग्ण आढळले. त्यामुळे नगर शहर व नगर ग्रामीण मिळून १३० रुग्ण आढळले आहेत. पारनेर-नगर कनेक्शनमुळे आता नगर तालुक्यातही रुग्ण वाढत असल्याचे दिसते. याशिवाय सोमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये कर्जत (६५), पाथर्डी (६२), संगमनेर (५२), नगर शहर (४९), शेवगाव (४७), राहुरी (२८), जामखेड (२७), श्रीगोंदा (२५), कोपरगाव (२४), अकोले (२१), नेवासा (२०), इतर जिल्हा (१२), श्रीरामपूर (५) येथील रुग्णांचा समावेश आहे.

--

कोरोनास्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : २,८३,५९०

उपचार सुरू असलेले रुग्ण : ४६६४

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६१३२

एकूण रुग्णसंख्या : २,९४,३८६

Web Title: With Parner, the number of patients has now increased in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.