पारनेर, श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:15+5:302021-07-02T04:15:15+5:30
अहमदनगर : पारनेर तालुक्यात सर्वाधिक ३७९, तर श्रीगोंदा तालुक्यात २५४ कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत. यासह शेवगाव व पाथर्डी तालुक्यातही ...

पारनेर, श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
अहमदनगर : पारनेर तालुक्यात सर्वाधिक ३७९, तर श्रीगोंदा तालुक्यात २५४ कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत. यासह शेवगाव व पाथर्डी तालुक्यातही रोज सरासरी ५० ते ६० रुग्ण बाधित होत आहेत. नगर शहरात रोज १० ते १५, तर भिंगारमध्ये २ ते ३ रुग्ण आढळून येत असल्याने नगरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. जिल्ह्यात रोज १० ते १२ हजार चाचण्या होत असून चारशे ते पाचशे रुग्ण बाधित होत आहेत. बाधित होण्याचे प्रमाण हे २ ते ४ टक्के इतके कमी झाल्याने यंत्रणेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.
नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. भिंगारमध्येही कोरोनाचे रुग्ण अत्यंत कमी आहेत. ग्रामीण भागात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांत रोजच ५० ते ६० पॉझिटिव्ह रुग्ण येत असल्याने या तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्याही दोनशे ते तीनशेच्या पुढे आहे. ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत आहे.
-----------
सक्रिय रुग्णांची संख्या (३० जून)
तालुका सक्रिय रुग्ण
नगर शहर ४९
अकोले १४२
जामखेड ११७
कर्जत ८५
कोपरगाव ७२
नगर ग्रामीण १००
नेवासा ७४
पारनेर ३६९
पाथर्डी २०३
राहाता ७५
राहुरी १५६
संगमनेर १४८
शेवगाव १६२
श्रीगोंदा २५४
श्रीरामपूर ८०
भिंगार ०२
मिलिटरी हॉस्पिटल -०२
इतर जिल्हा ५५
एकूण २१४५
-------------------
गुरुवारी ४८७ नवे रुग्ण
जिल्ह्यात गुरुवारी ४८७ नवे रुग्ण आढळले, तर ६४३ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. जिल्हा रुग्णालयात २२, खासगी प्रयोगशाळेत २०५ तर अँटिजन चाचणीत २६० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामध्ये पाथर्डी (६५), श्रीगोंदा (६२), पारनेर (५६), राहाता (३७), राहुरी (३६), जामखेड (३३), नगर ग्रामीण (३०), संगमनेर (३०), नेवासा (२८), शेवगाव (२६), कोपरगाव (१८), नगर शहर (१६), कर्जत (१६), अकोले (१३), श्रीरामपूर (१३), भिंगार (३) येथील रुग्णांचा समावेश राहणार आहे. त्यामुळे गुरुवारअखेर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २१५७ इतकी झाली आहे.
---
एकूण रुग्ण- २,८०,३४१
बरे झालेले- २,७२,२८०
उपचार सुरू- २१५७
मृत्यू नोंद- ५९०४
--------------