पारनेरमध्ये शालेय विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 15:21 IST2017-09-11T15:21:15+5:302017-09-11T15:21:27+5:30
पारनेर येथील सेनापती बापट विद्यालयातील सहावीतील विद्यार्थी महेश राजू खेडेकर यास शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोन जणांनी मोटारसायकलवरून पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

पारनेरमध्ये शालेय विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न
पारनेर : पारनेर येथील सेनापती बापट विद्यालयातील सहावीतील विद्यार्थी महेश राजू खेडेकर यास शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोन जणांनी मोटारसायकलवरून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलाने शिताफिने पळ काढल्याने त्यांची सुखरूप सुटका झाली. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.