जामखेडच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत परभणीचा डंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:33+5:302021-02-05T06:41:33+5:30
जामखेड : राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेत मुले व मुलांच्या धावण्याच्या स्पर्धेत परभणीच्या किरण म्हात्रे याने १५ कि.मी. धावण्याच्या स्पर्धेत ...

जामखेडच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत परभणीचा डंका
जामखेड : राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेत मुले व मुलांच्या धावण्याच्या स्पर्धेत परभणीच्या किरण म्हात्रे याने १५ कि.मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलींमध्ये अश्विनी जाधव हिने आठ कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून परभणीचा डंका वाजवला.
स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनने बुधवारी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टच्या संचालिका सुनंदा पवार यांनी केले. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, इंदूर मराठी भाषिक संघाचे अध्यक्ष युवराज काशिद, पोपटराव धनवे, माजी समाजकल्याण अधिकारी सुभाष लोळगे, विनय दाभाडे, संतोष जाधव, विशाल माने, मिलिंद जपे, क्रीडा विभागाचे प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी, सूर्यकांत मोरे, शहाजीराजे भोसले, सुरेश भोसले, मयूर भोसले, अयोजक बबनकाका काशिद, संतोष पवार, अजय काशिद आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते : १५ कि.मी. धावणे (मुले) प्रथम परभणीचा किरण म्हात्रे (११ हजार रूपये), द्वितीय छगन बोंबले (सात हजार), तृतीय पाथर्डीचा किशोर मरकड (पाच हजार), चतुर्थ दिनकर लिलके (तीन हजार), पाचवा विशाल चव्हाण (दोन हजार). मुलींच्या गटात : प्रथम परभणीची अश्विनी जाधव (पाच हजार), व्दितीय विशाखा बास्कर (चार हजार), तृतीय जयश्री मालवंडे (तीन हजार), चतुर्थ सुप्रिया कोळेकर (दोन हजार), पाचवा क्रमांक मोहिनी बडे (एक हजार). ज्येष्ठांमध्ये प्रथम कामगार तलाठी इराप्पा काळे, द्वितीय निवृत्त शिक्षक बाळकृष्ण जगताप व तृतीय गणेश झगडे व चतुर्थ माजी सैनिक बबन नाईक यांनी १५ कि. मी धावणे स्पर्धेत यश मिळविले. ५६० जणांनी सहभाग घेतला.
(फोटो २९ जामखेड मॅरेथॉन)
जामखेड येथील हाफ मॅरेथॉन स्पर्धेत हिरवा झेंडा दाखविताना मान्यवर.