परजणे यांची कोल्हे गटाशी सलगी
By Admin | Updated: March 18, 2024 16:09 IST2014-09-12T23:04:30+5:302024-03-18T16:09:40+5:30
कोपरगाव : आ़ अशोक काळे यांना कोंडीत पकडण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील नाराजांचे गट एक होत असल्याचे चित्र आहे़

परजणे यांची कोल्हे गटाशी सलगी
कोपरगाव : आ़ अशोक काळे यांना कोंडीत पकडण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील नाराजांचे गट एक होत असल्याचे चित्र आहे़ बाजार समितीत काळे-परजणे यांची सत्ता होती़ मात्र आता परजणे गटाने काळे यांचा पाठिंबा काढून कोल्हे गटास पाठिंबा दिला़ त्यामुळे कोल्हे-परजणे युतीचे मुरलीधर वाघचौरे यांची सभापतीपदी निवड झाली़
शुक्रवारी (दि़१२) बाजार समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक झाली़ या निवडणुकीत परजणे यांनी काळे गटाशी फारकत घेत कोल्हे गटाशी जुळवून घेतले़ कोल्हे-परजणे युतीच्या वाघचौरे यांना बारा मते मिळाली़ काळे गटाच्या रंजना उत्तम पाचोरे यांना सहा मतांवर समाधान मानावे लागले़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए़ पी़ पाटील यांनी काम पाहिले़ वाघचौरे यांच्या नावाची सूचना भास्करराव तिरसे यांनी केली़ त्यास संजय शिंदे यांनी अनुमोदन दिले़ संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी नवनियुक्त सभापती वाघचौरे यांचा सत्कार केला़
बाजार समितीची वाटचाल हायटेक पद्धतीने व्हावी़ पुन्हा अद्ययावत कांदा, टोमॅटो मार्केट सुरु व्हावे, शेतकऱ्याला विश्वास देवून उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न नवीन सभापती करतील, असा आशावाद कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला़