प्रजासत्ताक दिनापासून सरकारविरोधात रथयात्रा : किसान क्रांती समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:01 IST2019-01-15T17:01:03+5:302019-01-15T17:01:18+5:30
सरकारने आश्वासन देऊनही शेतक-यांची प्रश्नांची सोडवणूक न केल्याच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनापासून केंद्र सरकारच्या विरोधात रथयात्रा काढण्याचा निर्णय किसान क्रांती समन्वय समितीच्या बैठकित घेण्यात आला.

प्रजासत्ताक दिनापासून सरकारविरोधात रथयात्रा : किसान क्रांती समिती
शिर्डी : सरकारने आश्वासन देऊनही शेतक-यांची प्रश्नांची सोडवणूक न केल्याच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनापासून केंद्र सरकारच्या विरोधात रथयात्रा काढण्याचा निर्णय किसान क्रांती समन्वय समितीच्या बैठकित घेण्यात आला. आज राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील आयोजित बैठकित हा निर्णय घेण्यात आला. मुक्ताई-चांगदेव मंदिरासमोर ही बैठक पार पडली.
बैठकिस किसान क्रांती समन्वय समितीचे धनंजय जाधव, सुहास वहाडणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
२६ जानेवारीपासून सुरु करण्यात येणारी रथयात्रा १९ फेब्रूवारीपर्यत राज्यातील विविध भागात मार्गक्रमण करणार आहे. प्रजासत्ताक दिनी काळ्या फिती लावून ध्वज वंदन करण्यात येणार आहे. भाजप सरकारने आधी बसविले, त्यामुळे आता आम्ही सरकारकडे जाणार नाही. सरकारने आमच्या दारात आले पाहिजे, अशी भुमिका समितीने घेतली आहे.