पंचायत समिती सदस्याच्या घरावर हल्ला

By Admin | Updated: August 23, 2014 00:43 IST2014-08-22T23:31:19+5:302014-08-23T00:43:31+5:30

सोनई : पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे यांच्या घरावर दगडफेक करून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरूवारी रात्री सोनई गावात घडली.

Panchayat committee member's house attacked | पंचायत समिती सदस्याच्या घरावर हल्ला

पंचायत समिती सदस्याच्या घरावर हल्ला

सोनई : पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे यांच्या घरावर दगडफेक करून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरूवारी रात्री सोनई गावात घडली. उसनवारीच्या पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी नागरिकांनी सोनई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. तसेच घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी गाव बंद ठेवण्यात आले.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, गुगळे राहत असलेल्या सोनईतील घरी गुरूवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून चौघे आले. त्यांनी तोंडाला फडके बांधलेले होते. आवारातील कारवर त्यांनी दगडफेक केली. या गोंधळामुळे गुगळे यांना जाग आली. त्यांनी बाहेर डोकावले असता त्यातील एकाने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. ‘तुझा गेम करायला आलो’ असे म्हणत हल्लेखोर पसार झाले. अशी तक्रार गुगळे यांनी सोनई पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द आर्म अ‍ॅक्ट व धमकी देणे या कलमान्वये अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
(वार्ताहर)
ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. तेथे गुगळे यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध करून आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, सरपंच सखाराम वाघ, अप्पासाहेब निमसे, नितीन दरंदले, राजेंद्र बोरुडे, कल्याण गडाख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. गावात दादागिरी, दहशत सहन केली जाणार नाही. आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी यावेळी क रण्यात आली.
आरोपींचा शोध सुरू
या घटनेमागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु, हा प्रकार गुगळे यांच्या आर्थिक देवाणघेवाणीतून घडल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास सुुरु असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Web Title: Panchayat committee member's house attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.