अहमदाबादकडून बारामतीच्या दिशेने जाणा-या कंटेनरच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने भरधाव वेगातच या कंटेनरने पेट घेतल्याची घटना नगरमधील स्टेट बँक चौकात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. ...
अंगारे, धुपारे करुन नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी भेंडा (ता. नेवासा) येथील लांडेवाडीतील एका जणास नेवासा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. गुरुवारी दुपारी २ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. ...
भाजप-शिवसेना युतीमुळे आजपर्यंत शिवसेनेला नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. सध्या भाजपा व शिवसेनेमधील दुरावा वाढत आहे. भविष्यात युती तुटण्याची शक्यता गृहीत धरुन शिवसेनेकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराची चाचपणी सुर ...
अपंगांचा ३ टक्के निधी लाभार्थींच्या बँक खात्यात वर्ग करावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने नगरपालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
कोरेगाव-भीमा येथील घटनेतील दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दलित संघटनाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अजय साळवे व सुनील क्षेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
अहमदनगर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात गुरुवारी सकाळी सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेची निवडणूक झाली. यात विशाल सुभाष सकट याने सर्वाधिक १८ मते मिळवून विजय मिळविला. ...
कोरेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे एका वीस वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना सोमवारी (दि. १) घडली. याबाबत बुधवारी (दि़ ३) पीडित तरुणीने बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे. ...
पाणी पुरवठा करणा-या कर्मचा-यानेच दारूच्या नशेत मुख्य पाइपलाइनचे वॉल तोडल्याने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. या कृत्यामुळे कर्मचा-यांविरुध्द मंगळवारी पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. ...