नोकरीच्या आमिषाने नगर येथील तरुणाला आॅनलाइन ६८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालणा-या दिल्ली येथील ठगाला सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. हिमांशू रवी अरोरा (वय २४, रा. टिळकनगर, न्यू दिल्ली) असे या सायबर गुन्हेगाराचे नाव आहे. ...
बाजार समितीच्या कांदा अनुदानात अपहार झाल्याच्या तक्रारीची चौकशी धिम्या गतीने सुरू आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी पंधरा दिवसांत तपासणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश २२ डिसेंबरला दिले. मात्र, अजूनही माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. ...
बाह्यवळण रस्त्यावरुन वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीने सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागात गेट बंद आंदोलन केले. ...
पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत दोन हजार नगरकर सहभागी झाले होते. स्पर्धेत नेहा खाडे (तीन किलोमीटर), अक्षय शिंदे (पाच किलोमीटर) व निकेतन पालवे (दहा किलोमीटर) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ...
टेंभुर्णी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या निषेधार्थ तसेच आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी वडार समाज संघटनेने कोपरगाव येथे मूक मोर्चा काढला. ...
येथे दुचाकीवरुन जात आसलेल्या युवकाला कट मारुन त्या युवकालाच एका गटाने दमबाजी केल्याने वाद झाला. यामुळे दोन गट आमने-सामने आले़ त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. याची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे घटनास्थळी पोहोचले. ...
‘लोकमत’ सरपंच अॅवॉर्ड विजेत्या पाच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठविल्यास त्यांना पणन विभागाकडून बाजार ओटे बांधण्यासाठी तत्काळ अनुदान देऊ, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे केली़ ...
नगर-दौंड रोडवर वाळूची ट्रक व मारुती यांच्यात जोरदार धडक होऊन मारुती व्हॅनचा चालक देवीदास बापूराव बनकर (रा. माळवाडी अजनुज, वय ६५) हे जागीच ठार झाले. हा अपघात मातोश्री हॉस्पीटलसमोर गुरूवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. ...
सुजित झावरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे तसेच त्यांना पुरक राजकीय भूमिका घेणारे शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा सेनेचे उपतालुकाप्रमुख विकास उर्फ बंडूशेठ रोहकले यांनी गुरूवारी पत्र ...
कोरेगाव-भीमा येथील घटनेतील दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दलित संघटनाच्या वतीने आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. ...