कोरेगाव-भीमा, सणसवाडी (ता. शिरूर) येथे १ जानेवारी रोजी झालेल्या जातीय दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या राहुल बाबाजी फटांगडे या तरुणाच्या मारेक-यांना पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथून पोलिसांनी अटक केली. ...
७ जानेवारीअखेर राज्यात झालेल्या गाळप व साखर उत्पादनापेक्षा यावर्षी याच तारखेला दुप्पट गाळप व उत्पादन झाले आहे. ७ जानेवारी २०१७ रोजी राज्यात २४०.५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी ४४०.४७ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. ...
नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी सतत आजारपणाच्या रजेवर जात असल्याने प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे विकास कामे ठप्प होऊन नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ...
सार्इंचा रुग्णसेवेचा वसा चालविणा-या साईनाथ रूग्णालयात गेल्या वर्षभरात जवळपास ३ लाख ६६ हजार रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. यात ३ लाख ५१ हजार बाह्यरूग्ण तर १५ हजार ६७२ अंतर्रूग्णांचा समावेश आहे. ...
दुधाच्या कमी झालेल्या भावासंदर्भात तातडीने हस्तक्षेप करा, अन्यथा दुग्धविकास मंत्री महादेव जाणकार यांच्या दारात दूध ओतून आंदोलन छेडू, असा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ.अजित नवले यांनी दिला आहे. ...
कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील मांडओहळ रोडवरील कमळजादेवी वस्ती परिसरात बिबट्याचा १५ दिवसापासून मुक्त संचार होता. त्यामुळे शेतकरी, शालेय विद्यार्थी व रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या अगोदर बिबट्याला पकडणासाठी पिंजरा लावला होता. ...
महिलांमध्ये उपजतच चवदार पदार्थ बनविण्याची कला आहे. पण, त्यांना आकर्षक पॅकेजिंग करता येत नाही़ सरकारतर्फे महिलांना उत्तम पॅकेजिंग व मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले जाईल, तसेच त्यांच्या उत्पादनांचा ‘अस्मिता’ ब्रॅण्ड करण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकासमंत्री ...
कुख्यात दरोडेखारे दीपक पोकळेसह त्याच्या टोळीविरोधात पोलिसांनी मोक्कातंर्गत (संघटित गुन्हेगारी) कारवाई केली असून, टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
नोकरीच्या आमिषाने दिल्ली येथील हिमांशू रवी अरोरा याने महाराष्ट्रातील तब्बल ५० जणांची आॅनलाइन फसवणूक केल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या रॅकेटमध्ये आठ जण कार्यरत आहेत. ...