गोदावरी पेट्रोल पंप ते जुना टाकळी नाका रस्ता कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी परिसरातील व्यापा-यांनी दुकाने बंद ठेऊन बाजार समितीसमोर तीन तास धरणे आंदोलन केले. ...
गेल्या चार दशकात तब्बल पाच हजार मंदिर बनविणारा अभियंता मोहनलाल सोलंकी यांची भटकंती सुरू आहे. पोट भरण्यासाठी गावोगावी फिरणा-या सोलंकी यांच्यासह चार कुटुंब सध्या पाल ठोकून राहुरी येथील नांदूर रस्त्यालगत मुक्कामी आहे. ...
शेतक-यांचा प्रति एकर उत्पादन खर्च जास्त आहे. हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी संशोधन व्हावे, असे आवाहन नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या आणि पीक शास्त्र) डॉ. ए. के. सिंग यांनी बुधवारी येथे केले. ...
नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कर्जुले हर्या शिवारातील मांडओहळ फाट्यावर धरधाव वाळूच्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ...
श्रीरामपूर शहरातील शिवाजी रस्त्यावरील उंडे अॅग्रो या कृषी सेवा केंद्रास बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमार आग लागली. आगीत सुमारे २० लाख रुपये किमतीची खते व किटकनाशके जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते. ...
गोंडेगाव येथील महाविद्यालयीन युवतीवर अॅसिडसदृश पदार्थ फेकण्यात आला. प्रसंगावधान राखत हल्ला चुकवल्याने युवतीला कुठलीही इजा झाली. याप्रकरणी दोघा तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. ...
पक्षाकडे मंत्रिपद असूनही दलित समाजावर अन्याय होत आहे. मंत्रिपद असूनही कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. तसेच त्यांनी पक् ...
‘मानधन नको, वेतन द्या’, ‘अरे या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, अशा जोरदार घोषणांनी जिल्ह्यातील आशा व प्रवर्तक महिलांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला. ...
महापालिकेच्या माध्यमातून नगर शहरात पाचशे घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी रमाई आवास योजनेतून १२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती महापौर सुरेखा कदम यांनी दिली. ...