टेंभुर्णी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडूनही अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक न केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी वडार समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. ...
नोव्हेंबर २०१७ ला केंंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मुंबईत राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी आणि लष्कराच्या अधिका-यांची बैठक घेऊन जमीन हस्तांतरण करण्यासाठी एक महिन्यात कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. ...
वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गोपाळ उंबरकर व आगार प्रमुख राणी वर्पे यांनी बसस्थानकाच्या आवारात उभ्या केलेल्या खासगी वाहनांवर दंडात्मक सुरू केली आहे. ...
अष्टवाडा उपनगरात राहणा-या दुर्गा कोष्टी (वय ६०) यांचा रात्री चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. मात्र, घरातून कोणतीही वस्तू चोरीस गेली नसल्याचे सांगत पोलिसांनी कोष्टी यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. ...
गतिमंद, दिव्यांग व निराधार मुलांचे अपहरण करून त्यांना भीक मागायला लावणारी टोळी नगर शहरात कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परळी (जि़ बीड) येथून ६ महिन्यांपूर्वी गायब झालेला १८ वर्षांचा मतिमंद मुलगा सोमवारी शहरातील कोठला परिसरात भीक मागताना आढळल्यान ...
अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी विद्युत विभागाचे प्रमुख तथा शहर उपअभियंता रोहिदास सातपुते आणि इलेक्ट्रीक सुपरवायझर बाळासाहेब सावळे हे प्रथमदर्शनी दोषी आढळले होते. ...
शिर्डीत लोहार समाजातील पहिली मुलगी शाळेत जाण्याच्या ऐतिहासिक घटनेला यंदा शंभर वर्षे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथील गाडी लोहार-सुतार समाजाच्या वतीने हे वर्ष समाजातील महिलांसाठी सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल. ...
जातीच्या दाखल्याअभावी आदिवासी विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
श्रीक्षेत्र मढी देवस्थानचे विश्वस्थ मंडळ बरखास्त करावे, असा ठराव मढी येथे सोमवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. विश्वस्त मंडळाच्या कारभारावर जाहीर नाराजी नोंदवीत आवाजी पद्धतीने हा ठराव घेण्यात आला. ...