अनेक वेळा पाठपुरावा करुनही कोठी ते यश पॅलेस रस्त्यावरील पथदिवे सुरु होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
मागील वर्षापासून नगर तालुका बाजार समितीत तूर, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाले आहे. या मार्केटमध्ये जिल्ह्यामधून शेतीमाल येत आहे . चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी जिल्हाभरातून विक्रीसाठी येत आहेत . ...
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. ...
नेप्ती उपबाजार समितीात गुरुवारी सकाळी कांद्याचे लिलाव सुरु होताच चांगल्या प्रतीच्या कांद्याला १२ ते १४ रुपये भाव व्यापा-यांनी जाहीर केला. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडून उपबाजार समितीबाहेर बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. ...
दुष्काळी परिस्थितीत २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये सुरू केलेल्या गुरांच्या चारा छावण्यांमध्ये २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा तक्रारदाराने केला असून ४२६ संस्थांवरील कारवाईची प्रक्रिया होऊन बुधवारी १३६ संस्थांविरोधात गुन्हे दाखल झाले. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्यात गुन्हेगार दत्तक योजना कार्यान्वित करण्यात आली असून, १ हजार ३५३ गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व गुन्हेगारांच्या हालचालींवर आता पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. ...
कोभंळी शिवारात चिचोंली रमजान फाट्याजवळील वळणावर स्टेरिंग रॉड तुटल्याने राशिन- अहमदनगर ही एसटी बस अचानक पलटी झाली. या अपघातामध्ये वीस प्रवासी जखमी झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत. ...
नगर तालुुक्यातील दरेवाडी येथील तुक्कड ओढामध्ये जिल्हा परिषद सेस फंडामधून मंजूर असलेला बंधारा दुरुस्ती आदेश असतानाही जिल्हा प्रशासनाकडून अचानक रद्द करण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमध्ये गेट बंद आंदोलन केले. ...
आगामी लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवार कोण हे आधी ठरवून घ्यावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे यांनी सूचित करुन चर्चेला जाहीर रुप दिले. मी कुठेही लढायला तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...
कागदोपत्री कंपनीची स्थापना करून यंत्रसामग्री घेण्याच्या नावाखाली कर्जप्रकरण करून चौघांनी बँक आॅफ महाराष्ट्रची तब्बल १ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ...