बेरोजगारी, शेतक-यांच्या आत्महत्या या पार्श्वभूमीवर साईनगरीत केवळ एक रूपयात लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची संधी मिळणार आहे. साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या गोरज मुहूर्तावर १०१ सर्वधर्मीय सामुदायिक व ...
सहकारी साखर कारखानदारीच्या इतिहासात प्रथमच शेतक-यांना जाहीर केलेल्या भावापेक्षा कमी भाव मिळू लागला आहे. कारखान्यांनी २३०० रूपये टनावरून भाव २१०० रूपये टन केला आहे. ...
कंपनी कायदा रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ऐन दहावी बारावीच्या परीक्षा काळातच तीव्र आंदोलन हाती घेण्याचा निर्णय मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे दहावी बारावी परीक्षेवर आंदोलनाचे सावट असणार आहे. ...
जगभरात गाजलेले चित्रपट अगदी मोफत पाहण्याची सुवर्णसंधी दरवर्षी न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या संज्ञापन अभ्यास विभागाच्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवात नगरकरांना मिळते. या वर्षी ११ वा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. ...
दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘जलयुक्त शिवार’ ही योजना पुढे आली अन् त्याचे सकारात्मक परिणाम अवघ्या दोन-तीन वर्षांत दिसू लागले. नगर जिल्हा तर या योजनेत अग्रेसर ठरला. ...
आघाडीच्या काळात पाटबांधारे, वीज, टँकर घोटाळा करुन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोलची भाषा करत आहेत़ त्यांनी जनावरांचा चारासुद्धा सोडला नाही. त्यामुळे जनता त्यांना रस्त्यावरच धडा शिकवेल, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यां ...
पतीचा पगार बँकेत आहे. पगाराव्यतिरिक्त बँकेत पैसे नाही. तरीही बँक खाते सील केलेय. आता भीक मागून जगायची वेळ आलीय. घर हप्त्याने घेतले असून गाडी, मोबाईलही कर्ज काढू घेतलाय. त्यामुळे देणेकरी दारात आहेत. माझ्या जीवाला काही झाले तर आयुक्तच जबाबदार असतील ...
कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारात गोदावरी नदी परिसरातून वाळूने भरुन चाललेल्या ढंपरचा पाठलाग करणा-या प्रांताधिका-यांच्या वाहनावर वाळू तस्कारांनी हल्ला केला. या हल्ल्यात प्रांताधिका-यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. ...
लग्नाचे आमिष दाखवून संगमनेरच्या एका महिला डॉक्टरवर शिर्डीतील हॉटेल व सरकारी विश्रामगृहात वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विजय मकासरे (मूळ रा. राहुरी, हल्ली रा. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध शिर्डी पोलिसात गु ...
विवाहितेस तब्बल दीड लाख रुपये दरमहा पोटगी देण्याचा अंतरिम आदेश श्रीरामपूरच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने दिला. विशेष म्हणजे अमेरिकेत स्थायिक असलेल्या पतीचा तेथील राहणीमानाचा दर्जा व आर्थिक मिळकत निकाल देताना गृहित धरण्यात आली आहे. ...